

विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
मयूर राणे, साम टीव्ही
Sanjay Raut on BJP: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी विधेयक नामंजूर होण्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेसकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीनेही विरोधकांच्या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीकडून राज्यात एका कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात मेळावे आयोजित केले जाणार आहेत. महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून राजकारण तापलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी देशासहित राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरही राऊतांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, 'कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. ज्याचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. भाजप किंवा भाजपमधील एका गटाला प्रधानमंत्री पदावरून नरेंद्र मोदींना घालवण्याचे वेध लागले आहेत. त्या गटांमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत की मला माहीत नाही'.
'मोदी पदावरून गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी, असे या गटाला वाटते. त्यासाठी 850 खासदारांचं षडयंत्र आहे. या माध्यमातून डीलिमिटेशन निर्माण करण्यासाठी हे बिल आणण्यात आलंय, असा आमचा आरोप नसून सत्य आहे. महिलांना आरक्षण देण्यासाठी आताही 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या, त्याच्यामध्ये आमच्या जागा जाणार असेल, तरी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.
'नरेंद्र मोदी यांनी जर मनात आणलं असतं, तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. परंतु नरेंद्र मोदी यांची खरोखर इच्छा असते, तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचे मन वळवलं असतं. या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते. डीलिमिटेशन बिलाचे महिला आरक्षण नाही, मी परत सांगतो डी लिमिटेशनच्या बिलाला अमित शहा यांनी गुलाबी साडी नेसून महिला आरक्षण म्हणून आणलं. नटापटा केला बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. विधेयकाचे सूत्रधार अमित शहा होते. हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी आहे. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीने निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या, अशी टीका राऊत यांनी केली.
'तुमची वकील पट, आम्ही वकिली न शिकता वकील झालो. कारण आम्ही देशासाठी तुरूंगात गेलो. तुम्हीच घातलं होतं आणि. तुरूंगातील जो वकील असतो, तो तुमच्या डिग्रीच्या पेक्षा भारी असतो. अमित शहा यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेणार नाही. देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षाला फोन केले. त्याचबरोबर या विधेयकाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून फोन करण्यात आले. पण हे डीलिमिटेशन बिल भाजप अंतर्गत वादाचा विद्रोह आहे, असा आरोप राऊतांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.