Kalyan Politics : शिंदे गट आणि भाजप पक्ष निवडणुकीच्या वेळी एकत्र कसे आले? ठाकरे गटाचा हल्लाबोल

Kalyan Political News : ' सत्तेतील शिंदे गट- भाजप मत मागण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरीत सरकारी उपक्रम राबवित आहेत, असा आरोप ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
Kalyan Politics
Kalyan PoliticsSaam Digital
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Political Latest News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. कल्याणमध्ये ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरु आहे. ' सत्तेतील शिंदे गट- भाजप मत मागण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरीत सरकारी उपक्रम राबवित आहेत, असा आरोप ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर केला आहे. डोंबिवली ठाकरे गटाच्या शाखेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

डोंबिवली ठाकरे गटाच्या शाखेतील पत्रकार परिषदेत आरोप करताना विवेक खामकर यांनी म्हटलं की, 'आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप केले जाताहेत. काही दिवसांपूर्वी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काल सायंकाळी चक्कीनाका परिसरातील मैदानावर शिल्लाई मशीन आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले.

'या कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकारी छाया वाघमारे यांनी यांनी आवाहन केले की, खासदार शिंदे यांना मतदार करा, असे आवाहन करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले.

Kalyan Politics
Mamata banerjee injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु

विवेक खामकर पुढे काय म्हणाले?

'सरकारी यंत्रणेचा गैरवापर मते मिळविण्याकरीता केला जातोय. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत गोळीबाराचा प्रकार घडला. शिंदे गट आणि भाजप आमदार यांच्या धूसफूस सुरु होती. गणपत गायकवाड यांच्यासारख्या आमदारावर अशी परिस्थिती यावी. त्याला पोलीस ठाण्यात बसून गोळीबार करावा लागला. त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली? ही बाब विचारात घेतली पाहिजे, असे विवेक खामकर म्हणाले.

Kalyan Politics
Ram Gopal Varma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर करत पवन कल्याण यांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले...

'मंत्री रवींद्र चव्हाण हे दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलत होते. आता ५११ कोटीचा निधी आणला. त्या आधी त्यांनी कल्याण डोंबिवलीचे विकासाचे मारेकरी शिंदे असा फलक लावला होता. आता असे काय झाले. त्यातले किती पैसे आणले. गाजर दाखविणे सुरुच आहे. कितीही गाजरे दाखविली, तरी कल्याण डोंबिवलीचा सुज्ञ नागरिक तुम्हाला तुमची जागा दाखविणार, असे खामकर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com