TET Exam Scam: अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पास, 35 हजार-2 लाख दर, पाहा पुणे पोलीस आयुक्तांनी काय-काय सांगितलं..

टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे.
TET Exam Scam
TET Exam ScamSaam Tv
Published On

TET Exam Scam: पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा म्हणजेच टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणात धक्कादायक आकडेवारी पोलीस तपासात उघड झालीये. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. यावर आज पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली (TET Exam Scam Pune Police Commissioner Amitabh Gupta Says Possibility Of Agents And Officers Involvement).

TET Exam Scam
TET Exam: 2019- 20 च्या TET परीक्षेत सर्वात मोठा घोटाळा उघडकीस

एजंट आणि अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता - पुणे पोलीस आयुक्त

2019 ची परीक्षा जी 2020 मध्ये (TET Exam Scam) झाली होती. त्यात 7 हजार 800 अपात्र (Fail) पात्र ठरवलेत, ही माहिती पोलीस (Police) तपासात उघड झालीये. आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. ही केवळ प्राथमिक माहिती आहे, सरकारला (शिक्षण परिषदेला) ही माहिती आम्ही देणार आहोत. 35 हजार ते लाखभर ते 2 लाख असा दर ठरलेला होता. यात एजंट आणि अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली.

TET Exam Scam
TET Exam Scam | TET परीक्षा घोटाळा, शिक्षण विभागाकडून चौकशी समितीची स्थापना

टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना केले पास

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन (Scam) त्यांना पात्र ठरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणाचा तपास (Investigation) करत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी (Cyber Police) केली. त्यात तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आले आहे.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेकडून जिल्ह्यानुसार टीईटीची परीक्षेची आकडेवारी मागवली आहे. परीक्षा परिषदेकडून आकडेवारी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात आकडेवारी न दिल्यास परिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिलाय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com