Sanjay Raut Live: "खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची भूमिका" - राऊतांचा टोला...

Sanjay Raut Latest News: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल ते म्हणाले की, सिंधुदुर्ग हा सेनेचा बालेकिल्ला आहे. आदित्य ठाकचेचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलं जाईल असंही ते म्हणाले.
Sanjay Raut on BJP
Sanjay Raut on BJPSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत महाविकास आघाडी विरोधात षडयंत्रं रचलं जातयं असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच "खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची पद्धत आहे" असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (telling lies confidently is bjp's strategy alleges by sanjay raut)

हे देखील पहा -

Sanjay Raut on BJP
Corona Cases Today: दिलासादायक! गेल्या 24 तासांत 1270 नवे कोरोनाबाधित रुग्ण

संजय राऊत (Sanjay Raut) भाजपवर टीका करत म्हणाले की, देवाच्या चरणी प्रत्येकानेच खरं बोलंल पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर प्रत्येकानं आपलं वर्तन तपासावं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विरोधात ज्या पद्धतीचा खोटेपणा, कटकारस्थान, षडयंत्र रचलं जातयं त्याला हिंदुत्ववादात त्याला स्थान नाही. सध्या विरोधी पक्षाचं असं आहे की, खोटं बोला पण रेटून बोला. मी इतकच सांगेन की सहज बोला, आणि सत्य बोला. सत्य रेटून बोलायची गरज नाही असा टोमणा त्यांनी भाजपला लगावला आहे. (Sanjay Raut on BJP)

गोवा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, प्रमोद सावंतांचं मी अभिनंदन करतो. गोव्याच्या विकासासाठी जाहीरनाम्यातली वचनं त्यांनी पुर्ण करावेत अशी मागणी त्यांनी केली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल ते म्हणाले की, सिंधुदुर्ग हा सेनेचा बालेकिल्ला आहे. आदित्य ठाकचेचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलं जाईल असंही ते म्हणाले.

Sanjay Raut on BJP
धक्कादायक! बंद गाळ्यांमध्ये सापडले केमिकल प्रक्रिया केलेले मानवी अवयव (पहा व्हिडिओ)

तसेच शरद पवारांसारख्या नेत्याच्या हातून एखाद्या स्मारकाचं उद्धाटन होत असेल आणि त्याला राजकीय विरोध केला जात असेल कर त्यांच्यात मानसिक गडबज आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टिका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com