Nashik News
Nashik Newsतबरेज शेख

धक्कादायक! बंद गाळ्यांमध्ये सापडले केमिकल प्रक्रिया केलेले मानवी अवयव (पहा व्हिडिओ)

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुंबई नाका येथील एका सोसायटीच्या बंद गाळ्यांमध्ये मानवी अवयव
Published on

तबरेज शेख

नाशिक - अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव आणि सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री मुंबई (Mumbai) नाका पोलीस (Police) ठाण्याच्याच पाठीमागील साेसायटीत घडली. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मुंबई नाका पोलीस स्टेशनलगत असलेल्या हरी विहार बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये हे अवयव सापडले असून ते फाॅरेन्सिक लॅब व मृतदेह परीक्षणासाठीच्या प्रयाेगशाळेत ठेवल्या जाणाऱ्या अवस्थेत आढळले आहेत. या गाळ्यांत वेगवेगळ्या बादल्यांमध्ये केमिकल परीक्षण व प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान व अन्य शारीरीक अवयव सापडले आहेत. केमिकल प्रक्रिया करून ठेवलेले मानवी अवशेष सापडले. दरम्यान, गाळे मालकाने दिलेल्या माहितीनुसार हे गाळे पंधरा वर्षापासून उघडलेलेच नाहीत. ते बंदच हाेते. याबद्दल मला काहीच माहित नाही असा दावा पाेलिसांकडे केला आहे.

हरी विहार सोसायटी मध्ये काही गाड्यांचे बॅटरी चोरीला गेल्यावर सोसायटीचे चेरमान चोरीला गेले बॅटरी शोधत असत्तांना त्यांना सोसायटीच्या परिसरातील अनेक वर्षासापुस बंद पडलेल्या गळ्याच्या आत हे अवयव दिसले त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली आणि हे सगळे प्रकरण समोर आलं

गाळा मालकांनी सांगितल्या प्रमाणे गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी या गाळ्यांत समान ठेवला असेल असे शिंदे यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.या बाबत मुंबई नाका पोलिस या घटनेच तपास करत आहे

एकूण पोलिसांनी मानवी अवयव आरोगय तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.मात्र मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या अवयव भाहर आले कशे आणि या बाबत मेडिकल कॉलेज कडून पोलिसांना या बाबत माहिती का दिली नाही या सारखे अनेक प्रशन या निमित्ताने उपस्थित होत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com