दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करा, भाजप महिला मोर्चाची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.
Deepali sayed
Deepali sayedsaam tv
Published On: 

मुंबई : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. वादग्रस्त वक्तव्यांबाबत दीपाली सय्यद नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दीपाली यांनी सडकून टीका केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केल्यानं दीपाली पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा बनल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप (BJP) प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलीय. तसंच दीपाली विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Deepali sayed
चिंताजनक! मुंबईत कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या २३१ टक्के वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपच्या गोटातून दीपाली यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दीपाली यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. दिपाली सय्यद यांच्या विरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Deepali sayed
MPSC Main Exam Result : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस

दरम्यान, भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रणिता चिखलीकर-देवरे, अॅड.वर्षा डहाळे, रिदा रशीद, रिटा मकवाना,शिल्पा गणपत्ये, प्रिया शर्मा आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर या शिष्टमंडळाने सय्यद यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सादर केले. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याचे निवेदन दिले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com