MPSC Main Exam Result : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
MPSC Latest update
MPSC Latest updateSaamTv
Published On

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा (MPSC Mains exam result) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससी २०२० ची मुख्य परीक्षा ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी परीक्षा २०२० चा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर (MPSC website) प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, प्रमोद चौगुले (Pramod chaugule) हा राज्यात सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे.

MPSC Latest update
मान्सूनच्या आधीच नांदेड जिल्ह्याला वादळी-वाऱ्यासह पावसाने झोडपले, हिंगोलीतही सरी कोसळल्या

मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले (बैठक क्रमांक PN005337) हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे. तर रूपाली गणपत माने बैठक क्रमांक (PN002157) या विद्यार्थीनीनं महिलांमधून बाजी मारली आहे. तसेच गिरीश विजयकुमार परेकर (बैठक क्रमांक PN002362) हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण दोनशे पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com