Pune NCP: सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर

Supriya Sule And Ajit Pawar: पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी बॅनर झळकले. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा.', अशा आशयाचे बॅनर पुण्यातल्या डेक्कन परिसरात लावण्यात आले.
Pune NCP:  सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर
Supriya Sule on Ajit Pawar Saam TV
Published On

अक्षय बडवे, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र यावेत याबाबत आता जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आले. सर्वांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली. अशातच आता पुण्यात सध्या झळकत असलेल्या बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पुण्यात राजकीय पक्षाचे बॅनर किंवा फ्लेक्स लावणं हे काही नवीन नाही. विविध पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक मजकूर असलेले फ्लेक्स लावत असतात. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं असा आशयाचा बॅनर पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

Pune NCP:  सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर
Maharashtra Politics: महाविकास आघाडीला खिंडार! ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आऊट गोईंग सुरू, 'धनुष्यबाण' घेणार हाती

पुण्यातील डेक्कन परिसरात राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत बॅनर लावण्यात आला होते. मात्र काही वेळातच तो बॅनर आता काढून टाकण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांनी एक फ्लेक्स लावला आहे.

Pune NCP:  सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर
Maharashtra Politics: राष्ट्रवादीची ताकद वाढणार, लवकरच सगळ्यांचं मनोमिलन; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

डेक्कन परिसरात लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर सुप्रिया सुळे यांना 'अजित दादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात' असा आशय लिहिण्यात आला आहे. तसेच 'सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा', असं सुद्धा बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. या बॅनरच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आली आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Pune NCP:  सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर
NCP: ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबही एकत्र येणार? नेत्याकडून पहिली टाळी, थेट युतीचे संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com