Supriya Sule: अजित पवारांसाठी ताई मैदानात! 'दादांचं नाव बॅनरवर का नाही?', सुप्रिया सुळे संतापल्या

Maharashtra Politics: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमावरून आता वाद झालाय, या कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदर शरद पवार आणि स्थानिक आमदार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने आता सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला.
Supriya Sule: अजित पवारांसाठी ताई मैदानात! 'दादांचं नाव बॅनरवर का नाही?', सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya SuleSaam Tv
Published On

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मध्यवर्ती सभागृहाच्या उद्घाटनाचा सोहळा झाला. या सोहळ्याच्या निमित्तानं बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे, आमदार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रित केले नसल्याबद्दल आणि बॅनरवर नावं ही नमूद केली नसल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

एवढंच नव्हे तर दादा स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांचं तरी नाव असायला हवं होतं असं सांगायलाही सप्रिया सुळे विसरल्या नाहीत. अजित पवारांचे नाव बॅनरवर का नाही?, असा सवाल शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Supriya Sule: अजित पवारांसाठी ताई मैदानात! 'दादांचं नाव बॅनरवर का नाही?', सुप्रिया सुळे संतापल्या
Maharashtra Politics: महायुतीत जागांवरून मोठा तिढा! भाजपच्या 20 जागांवर अजित पवार गटाचे आमदार; शिंदे गटाने केली थेट 'इतक्या' जागांची मागणी

बारामती लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यातील संबंधही ताणले गेले. रक्षाबंधनालाही दोघं एकत्र आले नाहीत. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमावरून (Punyashlok Ahilyadevi Holkar Government Medical College) वाद झाला. या कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदार शरद पवार आणि स्थानिक आमदार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.

Supriya Sule: अजित पवारांसाठी ताई मैदानात! 'दादांचं नाव बॅनरवर का नाही?', सुप्रिया सुळे संतापल्या
Pune News: मोठी बातमी! पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी, उरूळी देवाची गावे वगळली, काय आहे कारण?

तर दुसरीकडे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची होती. याबाबत अजित पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पवार कुटुंबातील फुटीनंतर दादासाठी ताईचं आक्रमक होणं बरंच काही सांगून जातं. आता सुप्रिया सुळे खरंच आक्रमक झाल्या की उपरोधिकपणे त्यांनी दादांचं नाव, प्रोटोकॉल याबाबत भाष्य केलं, असाही सवाल उपस्थित होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com