Shiv Sena Crisis: पुन्हा 'तारीख'! ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

Shiv Sena Supreme Court Hearing: शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर १९ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV

Shiv Sena Party and Symbol Hearing

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.  (Breaking Marathi News)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Maharashtra Election 2024: ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी

दरम्यान, ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) याचिकेवरील सुनावणी आता पुढच्या महिन्यात ६ मे रोजी होणार असल्याची माहिती आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. त्यामुळं ६ मेला तरी ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांसह १३ खासदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच असा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं. निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेताना खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, असा निकाल दिला.

या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने निकाल देताना पक्षपातीपणा केला, असा दावा करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली. मात्र, अनेक महिने उलटून गेलेत तरी देखील ठाकरे गटाच्या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नाही.

दरम्यान, ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १९ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला सुनावणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. येत्या ६ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल, असं सांगण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Aditya Thackeray: संविधान बदलणे ही देशासाठी धोक्याची घंटा.. आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com