Maharashtra Election 2024: ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी

Udayanraje Bhosale Got BJP Ticket From Satara Lok Sabha Constituency | सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीकडून उदयनराजे हे अधिकृत उमेदवार असतील.
Satara Lok Sabha: ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी
Udayanraje Bhosale is now Satara Lok Sabha Constituency's BJP CandidateSaam tv
Published On

सातारा लोकसभा मतदारसंघ:

सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीकडून उदयनराजे हे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात थेट 'सामना' होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची बारावी यादी आज, मंगळवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामधून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. पक्षाने उदयनराजे भोसले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.

Satara Lok Sabha: ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी
Sangli Constituency : सांगलीत ठाकरे गटाला धक्का; विशाल पाटील लोकसभा लढण्याच्या निर्णयावर ठाम, आज शक्तिप्रदर्शन करणार

उदयनराजे भोसले यांनी काल भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच अर्ज घेऊन ठेवला होता. तसेच त्यांनी अनामत रक्कम देखील भरली होती. उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यावर ठाम होते. तसेच त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. त्यानंतर आज मंगळवारी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Satara Lok Sabha: ठरलं तर! साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी
Kolhapur News : प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार; समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश

भाजपकडून उमेदवारांची १२ वी यादी जाहीर

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १२ वी यादी जाहीर केली. या यादीत सात उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील सातारा, पंजाबमधील ३ जागा, उत्तर प्रदेशच्या दोन जागा, पश्चिम बंगालमधील एक जागेचा समावेश आहे.

शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात

शरद पवार गटाने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शशिकांत शिंदे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. शशिकांत शिंदे यांनी काल शरद पवारांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. यावेळी शशिकांत शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी, आता सातारा लोकसभेत शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com