शिवाजी काळे
Teesta Setalvad News : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टानं अंतिरम जामीन मंजूर केला आहे. सेटलवाड यांना हा जामीन सशर्त देण्यात आला आहे. गुजरातमध्ये २०२२ साली झालेल्या दंगली प्रकरणात फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्र रचण्याच्या आरोपामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अखेर त्यांना अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरातमध्ये २०२२ साली झालेल्या दंगली प्रकरणात फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्र रचण्याच्या आरोपाअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सेटलवाड यांनी सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर त्यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती.
मात्र, सेटलवाड यांना तिथेसुद्धा दिलासा न मिळाल्याने त्या सुप्रीम कोर्टात गेल्या. सुप्रीम कोर्टात अखेर त्यांना अटीशर्तींसह मंजूर केला आहे. या प्रकरणी आता १७ सप्टेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश उदय लळीत यांच्या पिठानं हा निर्णय दिला आहे. त्यांच्याबरोबर या पिठात न्यामूर्ती एस. रविंद्र भट आणि सुधांशू धुलीया यांचा समावेश होता.
दरम्यान, गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतरांना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देणारी जाकिया जाफरी यांची याचिका काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांच्या 'एनजीओ'ची चौकशीचे गरज व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी अमित शाह (Amit Shah) यांनी 'एएनआय'च्या मुलाखतीत सेटलवाड यांच्यावर एक आरोप केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड (teesta setalvad) यांना गुजरात एटीएस पथकाने ताब्यात घेतलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.