

पुणे: मावळ तालुक्यातील पंचावन्न विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बोगस शेतकरी सभासदांच्या विरोधातील शिव सहकार सेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. प्रशासनाच्या या मोहिमेत विविध विकास सोसायट्यांमधील तेरा हजार १७० बोगस सभासदांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ११० संचालकांनाही अपात्र ठरवून या अपात्र संचालकांना सहा वर्षे निवडणूक बंदी घातल्याने मावळातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Success of Shiv Sahakar Sena's pursuit against bogus farmer members in Maval)
हे देखील पहा -
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील फारच मोठ्या प्रमाणात घडमोडी सुरू आहे. यासंदर्भात सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडे शिवसहकार सेनेकडून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. दोन वर्षांपूर्वीच विविध विकास सोसायट्यांमधील बोगसगिरीचा भांडाफोड झाला होता. यामध्ये दहा गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेले मयत, बोगस नावाने शेअर्स कमी असलेले सभासद अशा सुमारे तेरा हजारांहून अधिक बोगस शेतकरी सभासदांची पडताळणी करून त्यांची नावे काढून टाकण्यात आली आहे.
या बोगस सभासदांना कात्री लावल्यामुळे जे खरे शेतकरी सभासद आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. दरम्यान बोगस सभासदांमुळे विकास सहकारी सोसायट्या डबगाईला आल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आली होती. आता बोगस सभासदांना पाठिशी घालण्याचे काम सोसायट्यांचे सचिव करीत आहेत. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे.
मावळमध्ये शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्थात विकास सोसायट्याची संख्या पंचावन्न एवढी आहे. या सर्व संस्थांमध्ये ज्यांच्या नावावर शेती नाही म्हणजेच साधारणपणे दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा सोसायटीचे सभासद होते. वर्षानुवर्षे जमीन नावावर नसतानाही काही व्यक्ती सभासद होते. काहींनी जमिनी विकल्या तरीही सभासद होते. काही मयत झाले तरीही त्यांची नावे यादीत होती. तसेच अपूर्ण शेअर्स असलेलेही सभासद होते. अशा सुमारे तेरा हजार व्यक्ती चुकीच्या पद्धतीने अर्थात पात्र नसलेल्या व्यक्ती सभासद असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
अशा अपात्र सभासदांमुळे प्रत्येक निवडणुकीला खर्च वाढला. शेतकऱ्यांच्या हिताचा विषय सोडून गावपातळीवरील हेवेदावे, गटबाजी वाढल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आली. चुकीच्या पद्धतीने वर्षानुवर्षे सभासद म्हणून आहेत. ते कमी करण्याची धडक मोहीम २०१८ पासून हाती घेतली आहे. तसा पत्रव्यव्हारही विकास सोसायट्यांशी केला आहे. त्यानंतर बोगस सभासद दिसून आले, असे विठ्ठल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
सहकारी संस्था अधिनियम एकोणीस साठ कलम अकरा आणि कलम पंचवीसनुसार अपात्र ठरविले. सध्या मावळ तालुक्यात किती बोगस सभासद आहेत त्याचाही शोध सुरू आहे. सध्या सहा विकास सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या सोसायट्यांच्या सचिवांना बोगस सभासद ही बाब निदर्शनास आणून दिली. नजरचुकीने किंवा संचालक मंडळाने बोगस सभासदांना पाठिशी घातले तर संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ शकतील.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.