Mumbai : शिवसेनेच्या 'त्या' शाखेवर शासनाची कारवाई; शिवसैनिकांकडून नाराजी

तेव्हा त्यांना यासर्व शाखा अधिकृत वाटत होत्या आणि आज अनधिकृत वाटत आहे - सुभाष भोईर
Subhash Bhoir
Subhash BhoirSaam Tv

दीवा : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील दहिसर गावतील शिवसेनेची (Shivsena) जुनी शाखा गुरवारी शासनाने जमीनदोस्त केली. त्यामुळे शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.तर माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी सांगितले की तेव्हा त्यांना यासर्व शाखा अधिकृत वाटत होत्या आणि आज अनधिकृत वाटत आहे. हे एकप्रकारच राजकारणच आहे असं मला वाटतंय.

Subhash Bhoir
Kartiki Ekadashi: विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लवकरच नुतनीकरण केले जाईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शासनाच्या या कारवाई नंतर ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी नाराजी वाक्य केली आहे. भोईर याविषयी म्हणाले की, मला वाटत ही दुर्देवी घटना आहे. हा काळा दिवस माझ्या माहिती प्रमाणे आहे. कारण ज्या शिवसैनिकांनी, ज्या शाखा प्रमुखांनी त्या शाखा उभारल्या होत्या. त्या भागातील शेतकऱ्यांनी ज्यांना निवडून दिल त्यावेळस सर्व शिवसैनिकच म्हणून काम करत होते आणि तेव्हा त्यांना यासर्व शाखा अधिकृत वाटत होत्या आणि आज अनधिकृत वाटत आहे.

हे एकप्रकारच राजकारणच आहे असं मला वाटतंय. सर्व्हे नं ६३ यांच्यामध्ये आमची शिवसेनेची शाखा गेली ४० वर्ष पासून आहे.त्यांच्याखाली केंद्र शासनाचे  पोस्ट ऑफिस होते, बाजूला ग्रामपंचायत च कार्यालय आणि त्यांच्यावरती सरपंचाच कार्यालय असं असताना सुद्धा फक्त शिवसेनची शाखा तोडली जाते, याचा अर्थ हे राजकारण आहे, त्यावेळेस ते शिवसैनिक होते अता ते शिवसैनिक नाही अशा पध्दतीचं हे राजकारण दुर्दैवी आहे. पण अश्या प्रकारच राजकारण करून लोकांच्या मनामधलं तुम्ही ज्यागोष्टी मध्ये विष पेरलंय त्यामुळे हा चिडलेला शिवसैनिक कधी माफ करणार नाही, अशी त्याभागातील शिवसैनिकांची भावना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com