Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Pune News : पुण्यातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी शरद पवार यांना लिहिलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पात्रातून शिक्षक-विद्यार्थी यांचे नाते अधोरेखित होते.
Student Letter
Student LetterSaam Tv
Published On
Summary
  • हडपसर येथील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या बाईंची बदली थांबवण्यासाठी शरद पवार यांना भावनिक पत्र लिहिलं.

  • "ताई ओरडत नाहीत, खूप छान शिकवतात" असे नमूद करत ही बदली रद्द करावी अशी विनंती त्याने केली.

  • या पत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

  • या घटनेमुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांचाही विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला साक्ष देणारी एक भावनिक घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे. हडपसर येथील साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हमीद सुयोग बेंद्रे याने आपल्या वर्गशिक्षिका शारदा दवडे यांच्या अचानक झालेल्या बदलीविरोधात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राने विद्यार्थ्याचं शिक्षिकांवरचं प्रेम दिसून आलं.

पुण्यातील हडपसर येथील साधना प्राथमिक विद्यामंदिर येथे शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी विनंती केली. या पत्रात हमीदने अत्यंत निरागस आणि भावनिक शब्दांत विनंती केली , “ताई खूप छान शिकवतात, त्या कधीच ओरडत नाहीत, त्यांची बदली करू नका.” हा पत्राचा मजकूर आणि त्यासोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांना डोळ्यांत अश्रू आणणारा ठरत आहे.

Student Letter
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

हमीदच्या या पत्रात त्याने आपल्या शाळेचे नाव, वर्ग, शिक्षिकेचं नाव नमूद करून, ताईंची बदली झाल्याचं समजल्यावर झालेलं दुःख स्पष्ट केलं. "मला खूप रडू आलं," असं ही तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, आई-वडिलांनी त्याला सांगितलं की तुम्ही ताईना परत आणू शकता म्हणून हे पत्र लिहतो आहे. या पत्राने केवळ शिक्षकांबाबतच स्नेहच नव्हे, तर एका लहान मुलाच्या मनात शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम, विश्वास आणि नात्याची खोल जाणीव समोर आली आहे.

Student Letter
Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

शिक्षिका शारदा दवडे यांचं मुलांना शिकवण्याचं कौशल्य, विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागण्याची शैली यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यामुळे त्यांची बदली अनेक विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. हमीदचं हे पत्र समाजमाध्यमांवर झपाट्याने पसरत असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना शिक्षक बदल्यांचं नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या भावनाही महत्त्वाच्या असल्याचं मत मांडलं आहे.

विद्यार्थ्याने काय लिहलं आहे पत्रात ?

पुण्यातील हडपसर येथील शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी शरद पवार यांना पत्र लिहले आहे. या पत्रात विद्यार्थी म्हणाला, "माझे नाव हमीद सुयोन बेद्रे. माझ्या शाळेचे नाव-साधना प्राथमिक विद्‌यामंदिर, पुणे हडपसर २८ आहे. मी इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिकाः सौ. शारदा दवडे ताई आहेत. मला आज असे कळले आहे की त्या मला उदया पासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची अचानक बदली केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला आणि पप्पांना विचारले. बाईना परत आणायला काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या ताईना परत आणू शकता. कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा." असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे.

Q

हे पत्र कोणी लिहिलं आहे?

A

हे पत्र हडपसर येथील साधना प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हमीद सुयोग बेंद्रे याने लिहिलं आहे.

Q

पत्र कोणाला उद्देशून लिहिलं आहे?

A

हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्देशून लिहिलं आहे.

Q

पत्रात काय मागणी करण्यात आली आहे?

A

पत्रात शिक्षिका शारदा दवडे यांची अचानक झालेली बदली रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Q

समाजमाध्यमांवर या पत्रावर कशी प्रतिक्रिया आहे?

A

समाजमाध्यमांवर या पत्राला भावनिक प्रतिसाद मिळत असून अनेकजण शिक्षक बदल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करावा असं म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com