राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ; राज्य सरकारचा निर्णय

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली होती. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही केली होती.
Raj Thackeray
Raj Thackeray SaamTv
Published On

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना धमकी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांची सभा झाली होती. राज यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. या भूमिकेनंतर त्यांना धमकीही मिळाल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली होती. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही केली होती.

Raj Thackeray
Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ''माफी मांगो राज ठाकरे'' गीतातून विरोध !

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत अगोदर ४ पोलीस असायचे आता त्यात २ पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंसोबत ६ पोलीस असणार आहेत. राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी १ अंमलदार आणि १ पोलीस (Police) अधिकारी वाढवण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेवून राज ठाकरेंना संरक्षण वाढवण्याची मागणी केली होती. बाळा नांदगावकर यांना एक धमकीचे पत्र आले होते, या पत्रात राज ठाकरेंचाही उल्लेख होता. हे पत्र हिंदीमध्ये होते. या पत्रा प्रकरणी नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांनाही माहिती दिली होती. यावेळी राज ठाकरे यांना संरक्षण देण्याची मागणी नांदगावकर यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेत राज्य सरकारने वाढ केली आहे.

भोंगा प्रकरणावरुन आले होते धमकीचे पत्र

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळव्यात मशिदींवरील भोंग्या विरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला ४ मेपर्यंतचा इशारा दिला होता. ४ मे रोजी मनसेने राज्यभर आंदोलन केले होते.

भोंगा प्रकरणी आंदोलन सुरु केल्यानंतर बाळा नांदगावर यांच्या कार्यालयात उर्दू भाषेत एक धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरेंना काही झाले तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com