Pune Stampede : लोखंडी गेट तुटले, पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली चेंगराचेंगरीत जखमी, पुण्यात गोंधळ अन् राडा

Pune Latest News Update : पुण्यात राडा अन् चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. महिला पोलीस होण्यासाठी हजारो तरूणी पुण्यातील शिवाजीनगर येथे दाखल झाल्या पण चेंगराचेंगरीत अडकल्या. 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी 3000 मुलींची गर्दी झाली.
Pune Stampede
Pune Stampede
Published On

Stampede at Pune Police Recruitment: : पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक तरूणी पुण्यात दाखल झाल्या आहेत. पण भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्याचे दिसून आले आहे. पहाटे पासूनच भरतीसाठी आलेल्या मुलींची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे पहाटे रांगेत असलेल्या मुलींचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे गोंधळ उडाला. लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या आहेत. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्या आहेत, अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाली आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी ३००० पेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली होती, त्यात नियोजन नसल्यामुळे गोंधळ उडाला.

आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. पोलिस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आत मध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली, गर् जास्त असल्यामुळे अनेकांना दुखापत झाली. अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. यावेळी पालक संतप्त झाले.

Pune Stampede
Pune University Girls Hostel : दारुच्या बाटल्या अन् सिगरेटच्या पाकिटांचा ढीग, पुणे विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेमधील प्रकार; PHOTO Viral

त्यांच्या डोळ्यासमोर पोलीस व्हायचे स्वप्न घेऊन आलेले आपल्या मुली. परंतु अशा संघर्षामुळे त्यांच्या मनामध्ये दुफळी निर्माण झाली. यावेळी स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. पोलिस अधिकारी पवार म्हणून होते त्यांना देखील पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खरतर मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे.

Pune Stampede
Pune Crime : शर्ट फाडला, लाथा बुक्क्यांनी मारहाण, अपहरण करुन घाटात नेलं; दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला

सदरील भरती ही २०२२-२३ मधील पुणे कारागृह पोलिस भरती म्हणून रखडलेली आहे. एकूण 513 जागेसाठी ही रखडलेली भरती पार पडत आहे. इतर पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आली. मात्र, पुणे कारागृह पोलिस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नव्हता. परंतु आता कुठेतरी ही भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागत आहे. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com