साडे सात वर्षापुर्वी बोलले होते 'गंगाने बुलाया है'; अजून गंगा अस्वच्छ- मलिक

काशीच्या बाबतीत देखील आश्वासन देण्यात आलं होते
साडे सात वर्षापुर्वी बोलले होते 'गंगाने बुलाया है'; अजून गंगा अस्वच्छ- मलिक
साडे सात वर्षापुर्वी बोलले होते 'गंगाने बुलाया है'; अजून गंगा अस्वच्छ- मलिकSaam Tv
Published On

मुंबई : नरेंद्र मोदी देशांचे पंतप्रधान आहेत. त्यांचं ते निवडणूकीचं क्षेत्र आहे. प्रश्न असा आहे की साडे सात वर्ष झाले आहेत. त्यावेळी बोलले होते गंगाने बुलाया है. परंतु, अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झाली नाही. काशीच्या (Kashi) बाबतीत देखील आश्वासन देण्यात आलं होते. मात्र, त्याठिकाणी देखील काहीच झालं नाही. आगामी निवडणुकीमध्ये कमीत- कमी ते (election) 4 ठिकाणी हरणार आहेत. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरते. ज्याठिकाणी ते निवडणूक लढतात आणि आजूबाजूच्या 4 सीट निवडुन येणार नाहीत. कृपाशंकर सिंह यांच्यात किती माणुसकी आहे. (Spoken seven and a half years ago Nawab Malik)

हे देखील पहा-

याबाबत मी काय बोलणार. कृपाशंकर सिह यांना इतिहास बघावा लागेल. जेव्हा संघ निर्माण झाला आहे, तेव्हापासून त्यांची भुमीका बदलली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. मला न्यायालयाचा (court) आदेश प्राप्त झालेला नाही. ज्यावेळी कोर्टाचे आदेश मिळतील. त्यावेळी आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडू. पंतप्रधान (Prime Minister) कोण होतील हा विषय चर्चेला नाही. सामूहिक नेतृत्वाखाली आपण एकजूट होऊ या अशी तयारी सुरू आहे. काही लोकं म्हणतात की टीएमसी तुमचा आमदार फोडत आहेत.

साडे सात वर्षापुर्वी बोलले होते 'गंगाने बुलाया है'; अजून गंगा अस्वच्छ- मलिक
मुलाच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडले प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी

जे आमदार टीएमसी मध्ये गेले आहेत. ते ५ वर्षापूर्वी आमच्या पक्षात गेले होते की, त्यांची मागणी होती की त्यांच्यासह त्यांच्या मुलीला देखील तिकीट मिळायला हवी. परंतु, गोव्यात आमची काँग्रेस सोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले असावे की त्यांना दोन तिकीट मिळणार नाहीत. प्रशांत किशोर जे ठरवतील तेच होईल असे नाही. देशात २०१४ मध्ये युपीएच्या विरोधामध्ये जसे वातावरण तयार करण्यात आले होते तसाच प्रयत्न सुरू आहे.

योगी आदित्यनाथ यांनी देखील त्या शब्दाचा प्रयोग केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा भाजप (BJP) कधी दाखल करणार हा प्रश्न आहे. माझं आव्हान आहे की ज्या पत्रकाराला त्यांनी शब्द वापरला आहे त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी. एस टी संप जे वकील पुढे नेत आहेत त्यांना भाजप चालवत आहे. याच वकिलांना घेऊन भाजप ने मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण रोखले, यांना घेऊन अनिल देशमूख यांच्याविरोधात कारवाई केली. आता एस टीच्या कामगारांची दिशाभूल केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com