ST Bus Accident: माळशेज घाटात भरधाव ट्रकची एसटी बसला धडक; 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी

Malshej Ghat Bus Accident: कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
Speeding truck crashes st bus in malshej ghat Many Passengers injured Pune Accident
Speeding truck crashes st bus in malshej ghat Many Passengers injured Pune AccidentSaam TV
Published On: 

Malshej Ghat Bus Accident News

कल्याण येथून शिरोळीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Speeding truck crashes st bus in malshej ghat Many Passengers injured Pune Accident
Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने अनेक वाहनांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस (Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी आळेफाटा,ओतुर, नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) कल्याण येथून शिरोळीच्या दिशेने निघाली होती. या बसमधून २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास बस कल्याण नगर महामार्गावर खुबीजवळ आली असता, समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या भीषण अपघातात बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले. ट्रक उलटल्याने चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. अपघातानंतर माळेशेज घाटात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Edited by - Satish Daud

Speeding truck crashes st bus in malshej ghat Many Passengers injured Pune Accident
Rashi Bhavishya: रागाला आवर घाला, वाद विवाद टाळा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.