सोमेश्वरवर 'पवारांचीच' सत्ता; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा 21 जागांवर दणदणीत विजय

Sunetra Pawar Panel Wins All 21 Seats In Someshwar Election: बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अखेर पवारांचीच सत्ता आलीये. पवार काकी आणि पुतण्याच्या लढाईत अखेर काकीनं बाजी मारलीये. मात्र, ही निवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी सोप्पी नव्हती. पाहूयात अजितदादांच्या सहकाऱ्याच्या बंडखोरीमुळे झालेल्या तिरंगी लढतीवरचा हा रिपोर्ट...
SOMESHWAR SUGAR FACTORY ELECTION RESULT 2026
SOMESHWAR SUGAR FACTORY ELECTION RESULT 2026saam tv
Published On: 

बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 21 संचालकपदाच्या जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलनं सर्व 21 जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. तर दुसरीकडे, युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ झालाय. एव्हंढच नव्हे तर सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बंडखोरी करणारे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांच्या पॅनललाही राष्ट्रवादीनं पराभवाची धूळ चारलीये. स्वत: पुरूषोत्तम जगतापांचाही तब्बल 6464 मतांनी पराभव झालाय. मात्र, जगतापांनी परभवानंतर राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय...

विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी केलेलं बंड सभासदांना रुचलं नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, 13 वर्षे अध्यक्षपद देऊनही जगतापांनी पवार कुटुंबियांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेविरोधात सभासदांचा नाराजीचा सूर होता.

निवडणुकीआधीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी कारखान्यांच्या सभासदांच्या भेटीगाठी घेऊन विश्वास दिला होता. त्यामळेच सभासदांनी अजित पवारांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. यामुळे सोमेश्वरवर दादांनंतर आता वहिनींचं पर्व सुरू झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com