संजय गडदे -
मुंबई: मुंबईत सर्वत्र गणेश उत्सवाची (Ganeshotsav) धामधूम पहायाला मिळत आहे. सिने क्षेत्रातील अनेक कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध अशा गणपतींपैकी एक असणाऱ्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध गायिका लीसा मिश्रा यांनी उपस्थिती लावली होती.
मात्र, लीसा मिश्रा (Lisa Mishra) या शॉर्ट कपडे घालून आल्यामुळे त्यांना मंडळाकडून शाल देण्यात आली आणि त्यानंतरच लीसा मिश्रा यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेता आलं आहे मात्र, या प्रकरणावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं असून भक्ती महत्वाची की कपडे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाहा व्हिडीओ -
मात्र, अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी पूर्ण शरीर झाकतील अशी कपडे परिधान करावीत असा नियमच मंडळाने मागील १२ वर्षांपासून केला असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
तसंच अंधेरीचा राजाच्या (Andheri Raja) दर्शनासाठी प्रसिद्ध गायिका लिसा मिश्रा आली असता त्यांनी स्कर्ट घातला होता मात्र, स्कर्ट लहान असल्यामुळे त्यांना मंडळाने त्यांना शाल देत आपण पुर्ण कपडे असल्याशिवाय दर्शन देत नसल्याचं सांगून त्यांना गणपती दर्शनासाठी पुढं पाठवल्याचंही मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
हे नियम करायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले - देसाई
या सर्व प्रकरणावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी मंडळावर टीका केली आहे. असे नियम करायचे तुम्हाला कोणी अधिकार दिले. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य असून प्रत्येकाला कोणतीही कपडे परिधान करण्याचा अधिकार असल्याचं त्या म्हणाल्या.
समाजात वावरत असताना कपड्याचे भान ठेवायला हवं - भोसले
तर आपण समाजात वावरत असताना कपड्याचे भान ठेवायला हवं. शिवाय सर्वांना कोणतीही कपडे परिधान करायचा अधिकार आहे. मात्र, मंडळाचा नियम असेल तर तो पाळायला हवा असं मतं भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी व्यक्त केलं आहे. या सर्व प्रकरणामुळे आता भक्ती महत्वाची की कपडे महत्वाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.