Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune News : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू

  • पत्नीने पतीसाठी लिव्हर दान केले, तरी दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला

  • नातेवाईकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला

  • घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजात खळबळ

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पती-पत्नीच्या मृत्यूमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि त्यांच्या पत्नी कामिनी बापू कोमकर अशी मृत व्यक्तींची नावे असून, या दोघांच्या मृत्यूमुळे नातेवाईक आणि समाजात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापू कोमकर यांना गंभीर आजारामुळे लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. आपल्या पतीला नवीन जीवन मिळावे म्हणून पत्नी कामिनी कोमकर यांनी डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करत स्वतःचे लिव्हर दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. मागील आठवड्यात बुधवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेली शस्त्रक्रिया अखेरीस दाम्पत्याच्या जिवावर बेतली.

Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत म्हणजे शुक्रवारी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईक आधीच शोकाकुल झाले होते. परंतु त्यांच्यावर आणखी एक संकट कोसळले. बरोबर आठ दिवसांनी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दाम्पत्य दोघांचेही आयुष्य या उपचारांच्या नावाखाली संपुष्टात आले.

Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?

कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, रुग्णालयाने आणि संबंधित डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला. योग्य ती काळजी घेतली गेली असती तर दाम्पत्याचे प्राण वाचले असते, असा ठाम आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे कोमकर कुटुंबीयांनी सह्याद्री हॉस्पिटल व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune Ganeshotsav: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी २५ तारखेला शमणार, पोलिस आयुक्तांची ग्वाही

या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ओळखले जाते. देशातील नामांकित रुग्णालयांपैकी एक मानले जाणारे हे हॉस्पिटल अचानक अशा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune Ganeshotsav: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी २५ तारखेला शमणार, पोलिस आयुक्तांची ग्वाही

लिव्हर ट्रान्सप्लांट ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून त्यात जोखीम असते. मात्र, सलग पती-पत्नीच्या मृत्यूमुळे रुग्णालयाच्या प्रक्रियेवर, उपचार पद्धतीवर आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

Shocking News : पुण्यात हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू; हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune News: पुणेकरांना सर्दी, खोकल्‍यानं वाढला 'ताप', साथीच्या आजाराचे रूग्ण वाढले, काय घ्याल काळजी?

दरम्यान, कोमकर दाम्पत्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. पतीला वाचवण्यासाठी आपले लिव्हर दान करणाऱ्या पत्नीने अखेरीस स्वतःचेही प्राण गमावले आहे. सध्या संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिस यामध्ये कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com