Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?

Pune-Lonavala Train Travel: पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार केली जाणार आहे.
Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?
Pune-Lonavala Train TravelSaam Tv
Published On

Summary -

  • पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्पाला मंजुरी.

  • यासाठीचा ५० टक्के खर्च राज्य सरकार आणि ५० टक्के खर्च रेल्वे मंत्रालय करणार.

  • प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार.

  • वाहतूक कोंडी कमी होऊन कनेक्टिव्हिटी सुधारेल.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते लोणावळा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवासादरम्यान किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. महाराष्ट्र सरकारने पुणे ते लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंगळवारी मान्यता दिली. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाचा खर्च ५० टक्के राज्य सरकार करणार आहे तर ५० टक्के खर्च रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे ते लोणावळा आणि लोणवळा ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि आरमदायी होणार आहे.

पुण्यातून लोणावळ्याला जाण्यासाठी लोकल आहेत. पण या लोकलची संख्या कमी आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे पण लोकलची संख्या कमी आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने तिसरी आणि चौथी मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच आता राज्य सरकारने पुणे- लोणावळा या ६६ उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मान्यता देखील दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यासह लोणावळा परिसरातील विकासाला आवश्यक कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. त्याचसोबत वाहतूक कोंडीचा ताण देखील कमी होईल.

Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?
Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

पुणे-लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका सुरू झाल्यानंतर पुण्यात होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होईल. पुण्यातून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल कमी असल्यामुळे आणि दोन लोकलमधील कालावधी देखील मोठा आहे त्यामुळे प्रवाशांना अनेकदा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. बस, कॅब किंवा खासगी वाहनांनी प्रवास करताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्याचसोबत त्यांना प्रवासासाठी जास्त वेळ देखील लागतो. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या निर्णयामुळे या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कारण या मार्गिकांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल.

Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?
Pune : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण आता ‘राजगड’, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपर्वी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाकांक्षी कॉरिडॉरची घोषणा केली होती. यामध्ये पुणे ते लोणावळा -६३ किलोमीटर या मार्गाचा समावेश अतिव्यग्र म्हणजे उच्च घनता कॉरिडॉरमध्ये आणि दुसरा पुणे-सोलापूर-वाडी - ४१२ किलोमीटर या मार्गाचा समावेश ऊर्जा कॉरिडॉरमध्ये केला आहे. त्यानुसारच येणाऱ्या ७ ते ८ वर्षांत लोणावळा-पुणे-सोलापूर-वाडी या ४७५ किलोमीटरच्या अंतरावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार केली जाणार आहे. या मार्गिकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अर्धा-अर्धा खर्च करणार आहे. ही मार्गिका तयार झाल्यानंतर त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास देखील अधिक वेगवान होईल.

Pune-Lonavala: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट, कसा आहे प्लान?
Pune : रस्त्यावर शेण टाकून केली अस्वच्छता; पुणे महापालिकेकडून गुन्हा दाखल, दूध विक्रेत्यांना दंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com