Saam TV Exclusive: न्यायव्यवस्थेला हादवरणारी बातमी, न्यायाधीशांची खोटी सही करून आरोपींनी मिळवला जामीन VIDEO

Shocking Court Scam: न्यायवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उभी होत असताना आता पुणे कोर्टातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
court fraud fake judge signature
court fraud fake judge signatureSaam Tv
Published On

अक्षय बडवे,साम टीव्ही

पुणे न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत एका प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवला आहे. होय! ही धक्कादायक घटना घडलीय ती शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात. सही असलेली एक खोटी ऑर्डर जोडून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केली. पण नेमकी न्यायाधीशांची बनावट सही करण्याची हिंमत केली कोणी? हा सगळा प्रकार आहे तरी काय? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून...

कसे घडले हे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही ५० वर्षे जुनी कंपनी असून, २०२२ मध्ये त्यांनी एका विमानतळासाठी टेंडर भरले होते. मात्र, टेंडर उघडताच त्यांचे डिझाईन आणि डायग्राम चेन्नईच्या इसन-एमआर प्रा. लि. कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉपी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सीटीआर कंपनीने जानेवारी २०२२ मध्ये पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इसन-एमआर कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी रवीकुमार रामास्वामी, हरिभाऊ चेमटे आणि आणखी तीन जणांना अटक करण्यात आली होती.

खोटी सही आणि बनावट निकालपत्राचा वापर

या संपूर्ण प्रकरणाची "साम टिव्ही" ने पडताळणी केली तेव्हा हे गंभीर वास्तव्य समोर आलं. आरोपींनी प्रक्रियेनुसार पुणे येथील दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला. तिथे उच्च न्यायालयाची फसवणूक करीत खोटे निकालपत्र आरोपीच्या वतीने सादर करीत आरोपींनी जामीन मिळवला. चार्जशीट वर आरोपींनी न्यायाधीशांच्या आदेश सुद्धा लिहला. या आदेशावरचा मसुदा तांत्रिक भाषेत लिहला गेला होता ज्यामध्ये यातील आरोपींवर लागलेलं सर्व गुन्हे रद्द झाल्याचे नमूद होतं. इतकचं काय तर पुणे न्यायालयातील न्यायाधीशांची बनावट सही सुद्धा केली.

court fraud fake judge signature
Pune News : स्वारगेट बलात्कार प्रकरण; बस प्रशासनाचे मोठे पाऊल; पुणे, पिंपरी चिंचवडमधील बसस्थानकांबाबत महत्त्वाचा निर्णय

खोटा निकाल कसा उघडकीस आला?

पुणे न्यायालयातील न्यायाधीश वहिदा मकानदार यांनी आरोपींना निर्दोष सोडणारा हाताने लिहिलेला निकाल आणि त्यावरची सही आपली नाही, हे सांगितल्याने सीटीआर कंपनीने तत्काळा पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खोटे निकालपत्र कुणी तयार करवून दिले यावर आता दोन्ही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र या प्रकरणातील मास्टरमाईंड पर्यंत पोलिसांनी जाऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी सी टी आर कंपनीने केली आहे.

court fraud fake judge signature
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रंगपंचमीला पुणे मेट्रो राहणार बंद

हरिभाई ज्ञानदेव चिमटे (रा.एकनाथ वाडी, अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन मेटकर यांनी २०२२ साली विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार चिमटेसह सहा जणांवर फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चिमटे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि त्यानंतर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्‍यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना चिमटे याने आपल्याला या गुन्ह्यातून वगळण्यात आले असून पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे, असा बनावट आदेश न्यायालयात सादर केला. त्या आदेशाच्या आधारे उच्च न्यायालयाने चिमटे याला जामीन मंजूर केला. जामिनाचा आदेश झाल्यानंतर फिर्यादी यांच्या वकिलांनी चिमटे याला गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचा आदेश कधी झाला याबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, चिमटे याला गुन्ह्यातून वगळण्याचा आदेशच झालेला नाही.

त्यामुळे फिर्यादी यांच्या वकिलांनी या बाबत येथील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली.

चिमटे यांनी बनावट आदेशाच्या आधारे जामीन मिळवला, असून तो जामीन रद्द करण्यात यावा व न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात केला. या अर्जाची दखल घेत मुंबर्इ उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शिवकुमार दिघे यांनी चिमटे याचा जामीन रद्द करत याबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com