सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही
नवी मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून गेल्या २४ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये ४ अल्पवयीन मुली आणि २ मुलांचा समावेश आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यापैकी एक अल्पवयीन मुलगा कोपरखैरणे येथील स्टेशनवर सापडला असून इतर मुलांचा शोध सुरू आहे.
या घटनेच्या पाठीमागे एखादी टोळी आहे का याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरातून एक मुलगी मित्राच्या वाढदिवसाला गेली जी परतली नाही. पनवेलमध्ये एक मुलगी सहकाऱ्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेली होती.
त्यानंतर ती देखील बेपत्ता झाली. कामोठे परिसरात एक मुलगी सोमवारी घरातून बाहेर पडली आणि ती बेपत्ता झाल्याचं समोर आलं. याशिवाय रबाळे येथून शाळेत निघालेली एक मुलगी आणि शौचालयात गेलेला एक मुलगा देखील बेपत्ता झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अचानक मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या पोलीस सर्व अल्पवयीन मुलांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.