Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवशाही बसने अचानक पेट घेतला, चालकामुळे १२ जणांचा जीव वाचला, महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai-Pune Expressway shivshahi bus accident : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला सकाळी अचानक आग लागली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai-Pune Expressway News
Mumbai-Pune Expressway News
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai-Pune Expressway News : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसने अचानक पेट घेतल्याने वाहतूक ठप्प झाली. आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांची जीव वाचले

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला तळेगाव टोलनाक्याजवळ भीषण आग लागली. पुण्याहून मुंबईला जाताना शावशाही बसने अचानक पेट घेतला. या शिवशाही बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाच्या प्रसंगावधाने १२ जणांचे जीव वाचले. चालकाच्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने बस बाजूला घेतली, 12 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बस चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai-Pune Expressway News
Mumbai-Pune Expressway : देशातील पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रात, महागड्या 'एक्स्प्रेस वे वर टोल किती?

चांदवच्या रेणुका देवी मंदिर घाटात ट्रेलरला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने रेणुका देवी मंदिर घाटात अचानक पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. विविध कारखान्यांसाठी अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला ५० हून अधिक टायर आहेत. घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतल्याने वाहनाच्या चालक व इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगावधानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे ट्रेलरवर ठेवलेली महत्त्वाची अवजड यंत्रसामग्री आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र, इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रेलरवरील अवजड मशीन महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Mumbai-Pune Expressway News
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोणत्या वाहनांना टोल किती आकारला जातो? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com