एकनाथ शिंदेंना तेव्हाच उद्धव ठाकरे पक्षातून काढणार होते? खळबळजनक माहिती समोर

शिंदे यांनी ठेवलेली भाजपशी जवळीक ठाकरे यांना आवडत नव्हती.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam TV
Published On

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जूनला एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड पुकारलं. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. आता सरकार कोसळेल अशाच चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अचानक असं बंड का पुकारलं याबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षभरापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवणार होते. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
सर्वात मोठी बातमी! सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

भाजपशी युती तोडत 2019 मध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाण्याचं ठरवलं. त्यानंतर तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी तरीही भाजपसोबत जवळीक ठेवली. शिंदे यांनी ठेवलेली भाजपशी जवळीक ठाकरे यांना आवडत नव्हती. यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवणार होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षातूनच जोरदार हालचाली सुरू होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
मी पुन्हा येईल! देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट

विशेष बाब म्हणजे मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर आजारी पडले नसते. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून अपमानित करत बाहेर काढलं असतं अशी माहिती सुद्धा त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद होते. हे मतभेद धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आलेल्या चित्रपटानंतर आणखीच वाढले असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदेंची कोंडी होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. एकनाथ शिंदेंची मागील वर्षभरापासून कोंडी सुरू होती अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited BY - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com