सुशांत सावंत
मुंबई : राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना असा सत्तासंघर्ष सुरू असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळच्या व्यक्तीने 21 जून रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला होता. त्यामुळे आता हा फोन सरकार वाचवण्यासाठी केला गेला होता का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे. (Maharashtra Political Crisis News Updates)
सूत्रांनी साम टिव्हीला दिलेल्या माहितीनुसार, "21 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती आहे. शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन फडणवीसांना फोन केल्याची माहिती आहे. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, आसाम गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असं विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. (Uddhav Thackeray News)
एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 शिवसेना आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी तसेच बंडखोर आमदारांना परत मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार 21 तारखेला शेवटचा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, खरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का? यासंदर्भात भाजपकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना इथे येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. इथे येऊन चर्चा करा, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबतही विचार करु असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत की, सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या निव्वळ भूलथापा, शिवसेनेकडून स्पष्टीकरण
सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे, अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचंय, ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Edited BY - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.