सर्वात मोठी बातमी! पेट्रोल तब्बल 40 रुपयांनी स्वस्त होणार? GST परिषदेच्या बैठकीकडे लक्ष

देशात पेट्रोल तब्बल 40 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel PriceSaam TV
Published On

नवी दिल्ली : इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पेट्रोल (Petrol) तब्बल 40 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. आज प्रतिलीटर 110 रुपयांनी मिळणारं पेट्रोल 70 रुपये प्रतिलीटर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल (Diesel) जीएसटीच्या कक्षेत आणले जाण्याची शक्यता आहे. माहितीनुसार आज आणि उद्या म्हणजेच बुधवारी चंदीगढमध्ये जीएसटी परिषदेची बैठक होत आहेत. या बैठकीमध्ये इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे. (Petrol-Diesel Latest Marathi News)

Petrol-Diesel Price
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मागील वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेत. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहन चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. तसं झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ते ऐतिहासिक ठरेल.

पेट्रोल आणि डिझेलवर सध्या केंद्र आणि राज्य सरकार अनेक कर आकारत आहेत. केंद्र सध्या पेट्रोलवर लागणारी एक्साईज ड्युटी 32.90 प्रतिलिटर आहे. 2014 पासून 2021 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये केंद्र सरकारने 300 टक्के वाढ केली आहे. 2014 साली पेट्रोलवर 9.48 रुपये प्रतिलिटर एक्साईज ड्युटी लागत होती. ती वाढून आता 32.90 प्रतिलिटर झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत असतात त्यामुळे पेट्रोलचे भाव दररोज बदलतात.

Petrol-Diesel Price
सोलापुरात शिवसेनाला मोठा झटका; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील शिंदे गटात

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर देशात सर्वाधिक आहे. राज्याचा सुमारे 14 टक्के महसूल पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो. महाराष्ट्रात पेट्रोलवर मूल्यवर्धित कर मुंबई-नवी मुंबई-ठाणे परिसरात मूल्याच्या 26 टक्के + 10.12 रुपये प्रतिलिटर आणि अन्यत्र मूल्याच्या 25 टक्के + 10.12 रुपये. म्हणजे साधारणतः मुंबई वगळता महाराष्ट्रात सध्या तो एकूण 26.36 रुपयांइतका येतो.

दरम्यान, जीएसटी कर प्रणाली 2017 सालीच लागू झाली होती. मात्र दारू आणि पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आलं नाहीये. मात्र आता जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या प्रणालीत आणलं आणि कमाल दर लावला तर पेट्रोल साधारणत: 70 ते 72 रुपये इतक्या दराने मिळून शकतं. मात्र केंद्र आणि राज्य सरकार याबाबत धाडस दाखवतील का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited BY - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com