मी पुन्हा येईल! देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट

भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे.
BJP, Devendra Fadnavis
BJP, Devendra FadnavisSaam Tv
Published On

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यातच आता शिंदे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे. (Devendra Fadnavis Latest News)

BJP, Devendra Fadnavis
सर्वात मोठी बातमी! सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेली शायरीचा उल्लेख आहे. 2019 च्या विधानसभा निकालानंतर राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं होतं. शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनले. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, "मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना. मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा" असं म्हणाले होते.

दरम्यान, 2019 च्या तुलनेत आता चित्र पालटलं आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला धक्का बसला. भाजपाचं संख्याबळ नसतानाही उमेदवार विजयी झाले. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला हादरा दिला. शिवसेनेचे तब्बल 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. भाजपासोबत सरकार बनवावं अशी आग्रही मागणी या गटाने केली आहे. त्यामुळे भाजपाचं राज्यात पुन्हा सरकार येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे शिंदे गटाने अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर 11 जुलैपर्यंत या आमदारांना उत्तर देण्याची मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने दिली. दरम्यान, शिवसेना अजूनही बंडखोर आमदारांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी यातील सर्वांनाच मी बंडखोर म्हणणार नाही. त्यातील काहीजण आमच्या संपर्कात आहेत. गुवाहाटीत बसून उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नका. मुंबईत या चर्चा करा असं आवाहनही राऊतांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय डबक्यात देवेंद्र फडणवीस यांनी उतरू नये असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Edited BY - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com