Belagavi Border Dispute : कालच्या बैठकीत पोहे खाण्यासाठी गेले होते का? उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

कालच्या बैठकीत पोहे खाण्यासाठी गेले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणीस सरकारला केला आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Saam Tv
Published On

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड केली. काल दिल्लीत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीवरून जोरदार निशाणा साधला. 'कालच्या बैठकीत नवीन काय झालं ? कालच्या बैठकीत पोहे खाण्यासाठी गेले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणीस सरकारला केला आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray News
Chitra Wagh: १८ वर्षांखालील मुलींसाठी लव्ह जिहाद कायदा गरजेचा; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडींच्या प्रमुख नेत्यांची आज, गुरुवारी १७ डिसेंबरच्या मोर्चावरून पत्रकार परिषद झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'काल दिल्लीत महाराष्ट्र-कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सीमावादावर चर्चा झाली. त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त ट्विट बोगस असल्याचं सांगितलं. मात्र, महत्वाचा मुद्दा हा आहे की, गेल्या १५ दिवसांपासून हा प्रश्न चिघळला जात आहे'.

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं का, हे लवकरच तपासात उघड होईल. मात्र, खुलासा करायला इतके दिवस का लागले? महाराष्ट्राच्या बसेसवर कर्नाटकात बंदी घालण्यात आली होती. हे सर्व ट्विटरवर झालं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी सजग असायलाचं हवं की, आपल्या ट्विटरवरून कोण काय बोलत आहे? तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray News
Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ

'सुप्रीम कोर्टात वाद असताना दोन्ही राज्याने बोलू नये, हा नवीन सल्ला नाही. सुप्रीम कोर्टाचं निकाल लागेपर्यंत महाराष्ट्राने थांबायचं का? कालच्या बैठकीत नवीन काय झालं? बैठकीत पोहे खाण्यासाठी गेले होते का? आज पर्यंत कर्नाटकच्या बाजूने प्रश्न चिघळवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाजूने नाही, असेही ठाकरे म्हणाले.

'कालची बैठक कशासाठी झाली? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट म्हणजे जखमेवर मीठ चोळलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल नुसतं होयबा करून आले आहेत, अशी टीका देखील ठाकरे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com