'रिक्षाला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला'; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

'उपमुख्यमंत्री सांगत होते थांबा थांबा, पण रिक्षाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे रिक्षावाला सुसाट निघाला, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
uddhav thackeray And eknath Shinde
uddhav thackeray And eknath Shinde saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. आज, मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'उपमुख्यमंत्री सांगत होते थांबा थांबा, पण रिक्षाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे रिक्षावाला सुसाट निघाला, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. ( Uddhav Thackeray News In Marathi )

uddhav thackeray And eknath Shinde
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ईडीच्या रडारवर; ED कार्यालयात ६ तास चौकशी

माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज,मंगळवारी शिवसेना भवनात महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'आम्ही सत्तेत असताना तीन चाकाचं सरकार अशी टीका केली जात होती. मात्र आता रिक्षा चालवणारा सरकार चालवत आहे. आता चालवा सरकार. ज्या पद्धतीने शिवसेनाप्रमुखाच्या पुत्राला खुर्चीतून खाली खेचलं, त्याचा आनंद त्यांना लखलाभ. पण लाभ कुठपर्यंत लाभेल ? त्यांना देखील कळू द्या'.

uddhav thackeray And eknath Shinde
राष्ट्रपती पदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; शिवसेना खासदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

'असं क्वचित होतं असेल की, मुख्यमंत्री पायउतार झाल्यावर जनतेच्या डोळ्यात अश्रू येतात. ही माझ्या आयुष्याची कमाई मानतो. मुख्यमंत्री असताना कोणाचा विश्वासघात केला नाही. कोणाला फसवलं नाही. त्यामुळे जनतेच्या अश्रूंची किंमत त्यांना भोगावी लागणार आहे. आज कांगावा केला जातोय की, सावरकरांचा अपमान केला.

पण आम्ही काय अपमान केला ? स्वत: देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारला सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पत्र दिलं होतं, मग त्यांना भारतरत्न का देण्यात आलं नाही ?'असा सवाल करत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. 'आपण त्यांच्या सत्तेत होतो, त्यावेळी औरंगाबादला संभाजीनगर नाव का दिलं नाही. धाराशिव का केलं नाही. मी शेवटच्या मंत्रिमडंळाच्या बैठकीत या जिल्ह्यांना नाव दिलं. मी या जिल्ह्यांना नाव देण्याचं ठरवलंच होतं, असंही ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com