मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ईडीच्या रडारवर; ED कार्यालयात ६ तास चौकशी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे हे दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होती यावेळी ईडीकडून त्यांची ६ तास चौकशी करण्यात आली आहे.
Sanjay Pandey  ED News
Sanjay Pandey ED NewsSaam TV
Published On

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे हे दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होती यावेळी ईडीकडून त्यांची ६ तास चौकशी करण्यात आली आहे. संजय पांडे यांना २ दिवसांपूर्वी ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार पांडे आज चौकशीला हजर राहिले होते. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)

संजय पांडे यांना ईडीने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवले होते त्यानुसार त्यांना आज ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशाचे पालन करत पांडे यांनी आज ईडी कार्यालयात हजेरी लावली.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सकाळी पांडे हे ईडीच्या कार्यालयात पोहचले आणि त्यांनी आपला जबाब ईडीकडे नोंदवला.

दरम्यान, पांडे यांच्यावर सीबीआयनेही फास आवळण्यास सुरूवात केली आहे. शंभर कोटी वसूली प्रकणावेळी पांडे यांनी परमबिर सिंह यांच्यावर लेटर मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे.

काय आहे प्रकरण ?

संजय पांडे यांनी २००१ मध्ये आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता पण तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. त्यानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाल्यावर त्यांनी आपली कंपनी मुलाला चालवायला दिली. २०१० आणि २०१५ च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. यावेळी घोटाळा झाला होता. या प्रकरणाची चौकशी आता ईडी करत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com