जयश्री मोरे
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देखील बोलून दाखवले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवास्थानी घेतलेल्या बैठकीबाबत देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.
राऊत म्हणाले, आता पर्यंत आम्हाला सत्ता आणि सरकार असल्याने संयम बाळगला पण पाणी डोक्यावरून जात असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हला इतरांना बुडवावे लागेल.. मग त्यांना गटांगला खाव्या लागतील.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, खेळी नसून जशास तसे उत्तर देण्याचे शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसे उत्तर आम्ही नेहमीच देत असतो हे आमचे बाळकडू आहे. काल शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी सर्वांची बैठक घेतली. खासदारांची वेगळी बैठक घेतली, प्रवक्तांची वेगळी बैठक घेतली आणि त्यांनी काही नक्कीच सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल.”
कालच्या बैठकीत ज्या सूचना दिल्या आहे ते नकीच पालन होणार. धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचे काम काही जण करत आहे खास करून महाराष्ट्रची बदनामी काही असामाजिक संघटना करत आहे. त्यांना उत्तर आणि सामोरे जाण्यासाठी तयार आहे.
त्यांनी सांगितले, शिवसेना हा छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाही. आम्हला लढण्याचे प्रशिक्षण देण्याचे गरज नाही असा इशाराही राऊतांनी दिला आहे. आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाही लढण्यासाठी..आम्ही दुसऱ्याच्या खाद्यवर बंदूक ठेऊन लढत नाही.आमची हत्यारे आमचीच आहे आणि ती धार दार आहे. दोन घाव बसले की पाणी मागणार नाही, संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.