Patiala Violence: पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात शुक्रवारी खलिस्तानविरोधी मोर्चावरून दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. चकमक सुरू झाल्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या गृह विभागाने शनिवारी पतियालामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच पंजाब सरकारने अनेक अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पटियालाच्या आयजी, एसपी आणि एसएसपींची बदली करण्यात आली आहे.
आता नवे आयजी म्हणून मुखविंदर सिंग चिन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, दीपक पारीख यांची नवीन एसएसपी आणि वजीर सिंग यांची एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, पटियालाचे उपायुक्त आणि एसएसपी यांनी काही लोक मोबाईल इंटरनेट सेवेचा गैरवापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे. अशा स्थितीत ते तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री फतेहगड साहिबमध्ये कलम 144 लागू;
दरम्यान, श्री फतेहगड साहिबमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पतियाला हिंसाचारानंतर शिवसेना हिंदुस्थान, शिवसेना बाल ठाकरे आणि इतर हिंदू संघटनांनी पटियालामध्ये बंदची घोषणा केली होती. यानंतर पंजाबच्या गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 पर्यंत मोबाईल इंटरनेट सुविधा बंद राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.