Udhav Thackeray In Thane: 'विकृतांपासून काळजी घ्यायला आलोय..' CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पक्षात मोठी बंडाळी होऊन सहा महिन्यांनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत..
Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShinde
Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShindeSaam TV

Thane: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर आपल्या भाषणातून चांगलीच तोफ डागली आहे. त्याचबरोबर लवकरच ठाण्यात मोठी सभा घेणार असल्याचेही आपल्या भाषणात सांगितले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत राजन विचारे यांच्यासह जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.

Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShinde
Republic Day 2023: आदिशक्तीच्या उदो उदोचा दिल्लीत गजर! महाराष्ट्राने देशाला घडवले साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन, Video Viral

काय म्हणाले ठाकरे...

यावेळी उद्धव ठाकरेंनी अगदी थोडक्यात शिंदे गटाचा समाचार घेतला. आपल्या भाषणात त्यांनी "आत्ता फक्त शिबिरासाठी आलो आहे, भाषण करायला नंतर येईल, ठाणेकरांच्या आरोग्याची विकृतांपासून काळजी घ्यायला आलो आहे," असे म्हणत शिंदे गटावर निशाण साधला.

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी "निष्ठेच्या मागे लांडगे गेले आहेत, अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, तेच निखारे, मशाल पेटवतील" अशी गर्जनाही केली. (Udhav Thackeray)

Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShinde
HSC Hall Ticket : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उद्यापासून परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला...

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आजवर शिवसेनेची सत्ता राहीली आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याची कमान हाती घेतली. त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांनी स्वतचा दबदबा निर्माण केला. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com