HSC Hall Ticket : इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शाळा तसेच महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उद्यापासून (२७ जानेवारी) सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र घेऊन ठेवावे असे सांगण्यात आले आहे. ( Latest 12th Hall Ticket News)
याबाबात शाळा तसेत महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाने संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही अतीरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याकडून शाळा जास्तीचे पैसे घेत असल्यास तत्काळ या बाबात तक्रार दाखल करावी. अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध होतं आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
तसेच दिलेल्या प्रवेशपत्रात छायाचित्रात सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचे दुसरे छायाचित्र चकटवावे. तसेच त्यावर मुख्यध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा. तसेच विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर, पुन्हा त्याची प्रत काढून घ्यावी आणि त्यावर लाला रंगाच्या शाईने द्वितीय पत्र असल्याचा शेरा द्यावा. तरच विद्यार्थ्याला परिक्षेस बसता येईल. असे राज्य मंडळा मार्फत सांगण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.