10th-12th Exam: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फीसह मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

अतिरिक्त शुल्क प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयीन किंवा शाळा यासाठीचे शुल्क भरत असताना त्यातच अतिरिक्त ५० रुपये आकारले जाणार आहेत.
10th-12th Exam
10th-12th ExamSaam TV
Published On

10th-12th Exam: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना जास्तीचे शुल्क भरावे लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा व्यतिरिक्त बोर्डाकडे अतिरिक्त ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची तपासणी करत छाननी करावी लागते. त्यात त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करावी लागते. यासाठी विभागीय मंडळामार्फत कंत्राटी कर्मचारी नेमले जातात. या कामासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

10th-12th Exam
International Student's Day 2022 : 'आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या, महत्त्व व इतिहास

फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून (Exam) हे छाननी फिस सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी आकारली जाणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सर्व विभागीय शिक्षण सचिवांना यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे अतिरिक्त शुल्क प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयीन किंवा शाळा यासाठीचे शुल्क भरत असताना त्यातच अतिरिक्त ५० रुपये आकारले जाणार आहेत. शिक्षण (Education) मंडळाच्या या निर्णयाला परीक्षा समितीची देखील मंजुरी आहे.

10th-12th Exam
Education Department : जिल्हा परिषद शाळेचे दांडीबहाद्दर मुख्याध्यापक, शिक्षक निलंबित

शाळेच्या कामांमध्ये आणखी वाढ

जर विद्यार्थ्याने अतिरिक्त शुल्क भरले नाही तर त्याचा परीक्षेचा प्रस्ताव स्वीकारला जाऊ नये, असे राज्य शिक्षण मंडळाणे सांगितले आहे. अशात अनेक शाळांमध्ये परीक्षा फॉर्म भरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शिक्षकांना आता पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांची यादी बनवून त्यांच्याकडून अतिरिक्त ५० रुपये घ्यावे लागणार आहेत. मात्र अतिरिक्त काम करणाऱ्या इतर शिक्षकांना आता त्यांच्या कामाचा मोबदला मिळवण्यासत मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com