Republic Day 2023: आदिशक्तीच्या उदो उदोचा दिल्लीत गजर! महाराष्ट्राने देशाला घडवले साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन, Video Viral

दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
Maharashtra Chitrarath 2023
Maharashtra Chitrarath 2023Saamtv
Published On

74th Republic Day: आज देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोशात साजरा केला जात आहे. अवघा देश तिरंग्याच्या तिन्ही रंगात न्हावून गेला आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्लीमधील कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राकडून राजपथावर नारीशक्तीचा जागर आणि साडेतीन शक्तिपीठे अशी थीम ठरवण्यात आली होती. राजपथावर आदिशक्तीचा उदो उदो चा गजर पाहायला मिळाला, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (74th Republic Day)

Maharashtra Chitrarath 2023
Cabinet Reshuffle: राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार? तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, कोण आहेत ते मंत्री?

राजपथावर देशभरातील विविध राज्यांचे आकर्षक चित्ररथ पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावर्षीच्या पथसंचलनात १७ राज्ये आणि दहा विविध केंद्रीय मंत्रालयांनी मिळून २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सादर केले.

महाराष्ट्राने या चित्ररथाच्या माध्यमातून कोल्हापुरची अंबाबाई, तुळजापूरची भवानीमाता तसेच वणीची सप्तश्रृंगी देवी अशा नारिशक्तीचे दर्शन राजपथावर घडवले.

Maharashtra Chitrarath 2023
Maharashtra Politics : जयंत पाटलांचा गौप्यस्फोट मग स्पष्टीकरण; पहाटेचा शपथविधी, राष्ट्रपती राजवट अन् पवारांची खेळी...

असा आहे महाराष्ट्राचा चित्ररथ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथात पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती आहे. समोरच्या डाव्या व उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा आहेत. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा आहेत.

चित्ररथाच्या मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजवणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती आहे. तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करणार आहेत. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत आहे.

‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला आकार देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा जागर करणारे गीत संगीतबद्ध केले आहे. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले आहे. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली आहे. (Delhi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com