Sanjay Raut : "कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारतात अन् CM शिंदे..."

तुम्ही दिल्लीत गेलात, तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? बोलायचं नाही काही असं सांगितलं आहे का?
sanjay raut
sanjay rautSaam Tv
Published On

Sanjay Raut News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सुरु असलेला सीमावादाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी केला आहे. त्यावरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना या मुद्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. (Sanjay Raut Latest News)

sanjay raut
Whatsapp Update: व्हॉट्सअॅपवर चुकून Delete For Me केलंत? 'या' स्टेप फॉलो करा आणि तुमचा मॅसेज परत मिळवा

एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात, अशी टीका राऊतांनी शिंदेवर केली आहे.

महाराष्ट्राचे क्रांतिकारक मुख्यमंत्री यांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यायला पाहिजे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी जी क्रांती महाराष्ट्रात केली, त्या क्रांतीचाच एक भाग कर्नाटकात दिसत आहे. बोम्मई काय म्हणतायत त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय या कडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली म्हणजे काय केलं? जैसे थे म्हणजे काय? एवढं सगळं होऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची तशीच भाषा करतात, यावर तुम्ही काही बोलणार की नाही? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

sanjay raut
Mumbai Crime : पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून किमती वस्तू चोरी; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

तुम्ही या प्रश्नावर भूमिका घेत नसाल, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसण्यास योग्य नाही. तुम्ही इतर सगळ्या विषयांवर तासभर बोलता मग सीमाप्रश्नाबाबत तुम्ही बोलत का नाहीत? तुमची मजबुरी काय आहे. सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय?” असा सवाल देखील संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला. तुम्ही दिल्लीत गेलात, तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? बोलायचं नाही काही असं सांगितलं आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com