Whatsapp Update: व्हॉट्सअॅपवर चुकून Delete For Me केलंत? 'या' स्टेप फॉलो करा आणि तुमचा मॅसेज परत मिळवा

जर तुमच्याकडून डिजेट फॉर एव्हरीवन ऐवजी डिलेट फॉर मी झाले तर, तुम्हाला लगेच स्क्रिनवर अनडू हा पर्याय दिसेल.
Whatsapp Update
Whatsapp UpdateSaam TV
Published On

Whatsapp Update: व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवीन बदल होत आहेत. व्हॉट्सअॅपच्या अपडेटमुळे माहिती सुरक्षित ठेवणे शक्य झाले आहे. अशात अनेक व्यक्ती अजूनही मॅसेज डिलेट करताना येणाऱ्या समस्येवर तक्रार करत आहेत. अनेक वेळा मॅसेज डिलेट फॉर एव्हरीवन करण्याएवजी डिलेज फॉर मीवर क्लिक होते आणि मोठा गोंधळ होते. त्यामुळे यावर अपडेट यावे यासाठी युजर्स अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अशात आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण व्हॉट्सअॅपने डिलेटमध्ये नवीन अपडेट अॅड केले आहे. (Latest Marathi News)

कामात असताना किंवा अन्य कधीही तुमच्याकडून चुकून तुमच्या मित्राला पाठवायचा मॅसेज तुम्ही चुकून ऑफिसच्या ग्रुपवर टाकला असे हमखास घडले असेल. यात अपडेट करत हे मॅसेज डिलेट करण्याचा पर्याय आधी देण्यात आला. मात्र त्यातही अनेकांचा घोळ झाला. त्यामुळे व्हॉट्सअॅपने (Whatsapp) स्वत: त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत व्हॉट्सअॅपमध्ये अपडेट केल्याचे सांगितले आहे. यात तुम्हाला अनडूचा पर्याय देण्यात आला आहे.

Whatsapp Update
WhatsApp Call Record : आता Android यूजर्सना करता येणार WhatsApp चा कॉल रेकॉर्ड, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

चुकून डिलेट झालेला मॅसेज असा मिळवा परत

जर तुमच्याकडून डिजेट फॉर एव्हरीवन ऐवजी डिलेट फॉर मी झाले तर, तुम्हाला लगेच स्क्रिनवर अनडू हा पर्याय दिसेल. यात पाच सेकंदाचा कालावधी मिळेल. तुम्ही लगेच अनडू करू शकता. अनडू केल्यावर तुमचा डिलेट झालेला मॅसेज तुम्हाला परत दिसेल. मात्र यासाठी तुम्हाला फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com