WhatsApp Call Record : आता Android यूजर्सना करता येणार WhatsApp चा कॉल रेकॉर्ड, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

आम्ही तुमच्यासाठी अशाच काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करू शकाल.
WhatsApp Call Record
WhatsApp Call RecordSaam Tv
Published On

WhatsApp Call Record : WhatsApp वापरकर्ते जगभरात आहेत. फाईल्स शेअरिंगपासून ते समोरच्या व्यक्तीला न भेटताही आपल्याला त्याला व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून बोलता येते ते WhatsApp द्वारे. हे अॅप आपली सगळी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवते.

याशिवाय या अॅपवरून व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलही केले जातात. तसेच, आपण ज्या प्रकारे सामान्य फोनमध्ये कॉल रेकॉर्ड करतो, त्याच प्रकारे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अशाच काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे व्हॉट्सअॅप (WhatsApp) कॉल रेकॉर्ड करू शकाल. Android आणि iOS वापरकर्ते थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने हे करू शकतात.

अनेकदा यूजर्स व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डरचाही वापर करतात. ही पद्धत प्रत्येक वापरकर्त्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. व्हॉट्सअॅप थेट कॉल रेकॉर्डिंगला परवानगी देत ​​नाही. कधीकधी कॉल रेकॉर्ड करण्याची अधिक आवश्यकता असते. म्हणून आज आम्ही Android आणि Apple iOS वापरकर्त्यांसाठी WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याची टिप्स घेऊन आलो आहोत.

अँड्रॉईड यूजर्सने अशाप्रकारे करा व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड

  • अँड्रॉइड यूजर्स व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरू शकतात. यासाठी बाजारात कॉल रेकॉर्डर-क्यूब एसीआर सारखे अॅप आहे. Google Play Store वरून हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, पुढील स्टेप फॉलो करा

  • कॉल रेकॉर्डर-क्यूब ACR अॅप उघडा आणि सर्व परवानग्या द्या.

  • परवानगी दिल्यानंतर, तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल कराल किंवा कॉल उचलाल तेव्हा त्याचे विजेट दिसेल.

  • विजेट दिसत नसताना, हे अॅप उघडा आणि व्हॉइस कॉल म्हणून VoIP कॉल निवडा.

  • आता तुमच्या फोनमध्ये (Phone) WhatsApp कॉल्सचे आपोआप रेकॉर्डिंग सुरू होतील.

  • व्हॉट्सअॅपचे सर्व कॉल रेकॉर्डिंग फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह केले जातील.

Apple iPhone वापरकर्त्यांनी ही पद्धत अवलंबावी

  • आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला वेगळी पद्धत अवलंबावी लागेल. यासाठी मॅक उपकरणाची मदत घ्यावी लागणार आहे.

  • WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, Mac वर QuickTime अॅप डाउनलोड करा. यानंतर येथे नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करा.

  • आयफोनला मॅक डिव्हाइसशी कनेक्ट करा.

  • आता मॅक डिव्हाइसमध्ये QuickTime अॅप उघडा.

  • येथे File या पर्यायावर जा आणि New Audio Recording वर क्लिक करा.

  • यानंतर आयफोन निवडा आणि क्विकटाइम अॅपमध्ये दिसणार्‍या रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.

  • आता आयफोनवरून व्हॉट्सअॅप कॉल केल्यावर कॉल रेकॉर्डिंग मॅकमध्ये सेव्ह होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com