शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर असीम सरोदेंचा सर्वात मोठा दावा

Thackeray vs Shinde Supreme Court : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Thackeray vs Shinde Supreme Court
Thackeray vs Shinde Supreme Court
Published On

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद केला जात आहे. या न्यायालयीन लढाईवर आणि संभाव्य निकालावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय फिरू शकतो आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'शिवसेना' हे पक्षनाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात

ठाकरेंकडून युक्तीवाद झाला आहे. शिंदेंच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thackeray vs Shinde Supreme Court
शिवसेना सुनावणीनंतर राजकीय समीकरण बदलणार? ठाकरे गटाची पक्ष चिन्हाबद्दल पर्यायी मागणी काय?

असीम सरोदे काय म्हणाले?

या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी दावा केला की, निवडणूक आयोगाने स्वायत्तता बाजूला ठेवून दिलेला निर्णय बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्याचाच विजय होईल आणि कोर्टाचा निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरू शकतो.

Thackeray vs Shinde Supreme Court
Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

न्यायालयाचा निकाल आल्यानंतर 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही गटाला ते वापरता येणार नाही. 'शिवसेना' हा मूळ राजकीय पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. जर मूळ पक्ष ठाकरेंना मिळाला, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला नवीन चिन्ह घ्यावे लागेल किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल, असा मोठा दावा सरोदे यांनी केला.

Thackeray vs Shinde Supreme Court
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; वाचा क्षणाक्षणाची अपडेट

राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो, तर विधिमंडळ पक्षाचा कार्यकाळ मर्यादित असतो, त्यामुळे केवळ बहुमताच्या आधारे पक्ष चोरता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com