संजय राऊतांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत वाढ

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Sanjay raut
Sanjay raut saam tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना न्यायालयाने पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणी अटकेत आहेत.

Sanjay raut
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, करी रोडजवळ तांत्रिक बिघाड; चाकरमान्यांचा खोळंबा

पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. जवळपास १४ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष ईडी कोर्टात हजर केले.

कोर्टात येताना संजय राऊत हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असलेला भगवा रूमाल घालून आले होते. त्यानंतर राऊतांच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. ईडीने कोर्टात संजय राऊत यांची १० ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याचं सांगितलं. (Sanjay Raut Todays News)

Sanjay raut
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात पोहोचले

शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ सुरू असताना त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीने चौकशी केली. ईडीने शुक्रवार,५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशी सुरू झाली. ती सलग ६ तासापेक्षा जास्त झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com