Aaditya Thackeray : भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरेही सहभागी होणार? सूत्रांची साम टीव्हीला माहिती

या यात्रेमध्ये आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Aaditya Thackeray Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
Aaditya Thackeray Rahul Gandhi Bharat Jodo YatraSaam TV

Aaditya Thackeray News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत राहुल गांधी लोकांशी संवाद साधत असून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. असे असतानाच या यात्रेमध्ये आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Aaditya Thackeray Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
Andheri East By-Election Result Live : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल; कोण मारणार बाजी?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेत राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधत आहेत. भारत जोडो यात्रेत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीदेखील सहभागी होत आहेत.

आता लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात येणार असून यात्रेत ९ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरेही सहभागी होणार असल्याची माहिती आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतरही ते मराठवाडा दौऱ्यावरच असतील.

Aaditya Thackeray Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
2019 च्या विधानसभेत शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं नव्हतं, फडणवीसांचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे ७ नोव्हेंबरला अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, दौऱ्यावर असतील. याशिवाय ८ नोव्हेंबरला जालना, बीड, धाराशिवमध्ये दौऱ्यावर असतील. त्यानंतर ते राहुल गांधी यांच्यासोबत नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी काँग्रेसचं शिष्टमंडळ ठाकरेंना मातोश्रीवर भेटलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही या यात्रेत सहभागी होण्याची तयारी देखील दर्शवली होती. उद्धव ठाकरे गटातील नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसे संकेतही दिले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे सुद्धा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com