
मुंबई : एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेच्या चाव्या हाती घेतल्या.परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने 2019 ला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, पण त्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असं जाहीरपणे अनेकदा म्हटलं होतं. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 च्या विधानसभेत सेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं नव्हतं,असं स्पष्ट केलं. फडणवीस एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. (Devendra fadnavis given clarification about 2019 chief minister fifty-fifty formula of shivsena)
कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, 2019 च्या विधानसभेत सेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांनी जेव्हा ही मागणी केली तेव्हा आम्ही युती तोडून तिथून निघून गेलो.नंतर तीन दिवसांनी पुन्हा एकत्र बसलो आणि पालघरची उमेदवारी देऊन युती केली. त्यांनी काही खाती वाढवून मागितली.तेही आम्ही दिलं पण सीएम पद देण्याला आमचा सपशेल नकरा होता. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला ठरला नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.