Mla Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरच; शिवसेनेचे ५४ आमदार एकाच छताखाली येणार, कशी होणार सुनावणी?

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा लवकरच निर्णय लागणार आहे.
Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

सुरज मसुरकर

Shivsena Mla Disqualification Case Latest Updates:

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा लवकरच निर्णय लागणार आहे. या प्रकरणाची येत्या विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. हे आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपावलं आहे. या प्रकरणाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी शिवसेना आमदारांना विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत.

Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Maratha Andolan: आम्ही मनोज जरांगे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत; अर्जुन खोतकरांनी मांडली सरकारची भूमिका

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी मॅरेथॉन सुनावणी होणार आहे . एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे.

तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीवेळी शिवसेनेचे ५४ आमदार एकाच छताखाली येणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे.

Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Manoj Jarange Patil Protest: सरकारचा नवा जीआरही धुडकावला; मनोज जरांगे उपोषणावर ठाम; काय झाला निर्णय?

प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार आपले पुरावे सादर करतील, तसेच एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा देतील.

मग विधिमंडळ सर्वाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेची वेगळी मांडणी करण्यात येईल. विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com