छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरण: नवी मुंबईतील कर्नाटका भवनाला पोलीसांची सुरक्षा!

नवी मुंबईतील कर्नाटका भवनाची शिवभक्तांकडून तोडफोड होण्याची शक्यता होती.
छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरण: नवी मुंबईतील कर्नाटका भवनाला पोलीसांची सुरक्षा!
छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरण: नवी मुंबईतील कर्नाटका भवनाला पोलीसांची सुरक्षा!Saam Tv

नवी मुंबई: कर्नाटकच्या बंगळुरू येथे काही दिवसांपुर्वी समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला शाही फासत महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला होता. याचे तीव्र पडसाद राज्याभरात उमटले होते. ही घटना ताजी असतानाच बेळगावातही (Belgaum) महाराजांच्या पुतळ्याती विटंबना झाली. याच पार्श्वभूमीवर सावधगिरीचं पाऊल म्हणून नवी मुंबईतच्या वाशी येथील कर्नाटका भवनाला (Karnataka Bhavan, Vashi) पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Shivaraya's contempt case: Police security at Karnataka Bhavan in Navi Mumbai)

हे देखील पहा -

बंगळुरु आणि बेळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील कर्नाटका भवनाची शिवभक्तांकडून तोडफोड होण्याची शक्यता होती. अधिवेशनाच्या काळात ही घटना घडू शकते या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) कर्नाटका भवनाला काल (२२ डिसेंबर, बुधवार) पासूनच पोलीस बंदोबस्त लावत सुरक्षा (Security) दिली आहे. जेणेकरुन नाराज असलेल्या शिवभक्तांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com