Pune: शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी; महापौरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

राज्य सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली
Pune: शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी; महापौरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
Pune: शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी; महापौरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी Saam Tv
Published On

पुणे: कोरोना (Corona) संकटाने मागील २ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती (Shiva Jayanti) उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून यावेळी उमटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर (Mayor) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे यावेळी पत्राव्दारे केली आहे.

हे देखील पहा-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्याबरोबरच शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी इत्यादी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलत असताना मोहोळ म्हणाले की, शिवजयंतीनिमित्त पुणे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

Pune: शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी; महापौरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
शिवसेनेवर आरोप करणाऱ्या सर्वाना उद्या उत्तरं मिळतील- संजय राऊत

विविध संघटनांना मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. याबरोबरच या आठवड्यामध्ये पुणे शहरात सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याविषयी सूचना देण्यात आले आहेत. शिवजयंती महोत्सवाकरिता रथयात्रा आणि मिरवणूक याकरिता स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सर्व शिवप्रेमींकडून यावेळी करण्यात आलेली आहे.

दरम्यान महापालिका प्रशासनाकडून मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवर असलेले खड्डे बुजविण्यात यावे. रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com