डोंबिवली : भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत वेंगुर्ले नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणीसाठी पत्रकार आणि केडीएमसी अधिकाऱ्यांचा दौरा आयोजित केल्याचे सांगितले होते. तसेच कल्याण डोंबिवली मधील विकास कामांबाबत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्री असताना डोंबिबलीतील (Dombivli) रस्त्यांसाठी 472 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने अद्याप हा निधी दिला नसल्याची टीका केली होती.
हे देखील पहा :
रवींद्र चव्हाण यांच्या टीकेला शिवसेनेचे (Shivsena) शहर प्रमुख राजेश मोरे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कमद यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राजेश मोरे म्हणाले, रवींद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan) हे तीन टर्म आमदार आहेत आणि मंत्री पण होते. चव्हाण यांनी डोंबिवलीत काय विकास कामे केली हे त्यांनी सांगावे.
दुसऱ्या शहराच्या विकास कामासाठी चव्हाण यांनी आयोजित केलेला दौरा हास्यास्पद आणि अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी ज्या 472 कोटी निधीच सतत रडगाणं लावलं आहे. मात्र, अशी कोणतीही तरतूद एमएमआरडीएच्या (MMRDA) अर्थसंकल्पात नाही. असा कोणता निधी मंजूर झाला असेल तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना द्यावी. अन्यथा नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करू असे शिवसेनेने पत्रकार परिषद घेत सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.